दसरा मेळावा! एक सामाजिक व वैचारीक गरज!

भगवान गडावर दसरा मेळावा! एक सामाजिक व वैचारीक गरज! --दत्ता ढाकणे-बावीकर मागील काही दिवसांपासून भगवान गडावरील दसरा मेळाव्या विषयी ज्या उलट-सुलट बातम्या येत आहेत त्या ऐकुन सामान्य माणसांच्या मनाला वेदना होत आहेत.दसरा मेळावा होणार की नाही?पंकजा ताई गडावर येतिल की नाही? ताईंचे भाषण होईल कि नाही? दसरा मेळाव्याला विरोध कुणाचा? की या फक्त आफवा आहेत?अशे आनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत. मागिल ताळीस वर्षापासुन दसरा मेळावा आणि स्व.गोपिनाथ मुंढे साहेबांचे आतूट नाते होते.संत भगवान बाबांच्या आशिर्वादाने मुंढे साहेबांनी सामान्य,गोरगरिब,बहुजन समाज्याच्या कल्यानाचे स्वप्न पाहीले व सत्ता त्यांच्या पायाशि आणून ठेवली.सध्याची तरुण पिढी त्यांचे विचार ऐकत ऐकत मोठी झाली.मुंढे साहेबांनी आपल्या नेतृत्व व वक्तृत्व कौशल्याने लोकांना राजकिय व सामाजिक संस्कार दिला.ज्या प्रमाणे मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याची परंपरा त्याच प्रमाणे भगवान गडावरिल दसरा मेळाव्याची परंपरा.बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जनत...