पोस्ट्स

कविता

मला हव आहे! निळेनिळे आकाश पक्षांचा थवा हिरवेगार डोंगर  अन गारगार हवा झाडांची दाटी  बहरलेली शेती पाऊल वाट अन मऊ मऊ माती  झुळझुळ पाणी वाहणारे झरे हिरव्यागार रानात चरणारी गुरे नाचणारे मोर गाणारे  पक्षी हरणाच्या पाठीवर  छानछान नक्षी  छोटस घर   फुललेली फुले अन पाऊस आल्यावर  नाचणारी मुले  📝दत्ता ढाकणे- बावीकर 

डेमॉस्थेनिस

इमेज
डेमॉस्थेनिस ...! बोलणे ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. काही माणसे इतके सुंदर बोलतात की समोरच्या माणसाला बघता बघता खिशात टाकतात. काही आपल्या मनातील इप्सित समोरच्याला पटवून देतात, काही समोरच्यांवर इतके गारुड घालतात की समोरची व्यक्ती त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होते. ही देणगी आहे उत्तम वक्तृत्वाची.प्राचीन काळीही राजे महाराजे आपल्या सैन्याला युद्धासाठी भाषणातूनच चैतवायचे. अलेक्झांडरचे सैन्य जग जिंकायला निघाले ते त्याने केलेल्या उत्तम वक्तृत्वामुळेच. छञपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेताना आपल्या सवंगड्यांना आपल्या प्रभावी वाणीनेच स्वराज्याचे स्फुरण चढविले होते. आजपर्यंत झालेल्या सर्व युद्धांमध्ये सेनापतीने आपल्या सैन्याला उत्तेजित केल्यामुळेच ती युद्धे जिंकली गेल्याचे उल्लेख आहेत. आधुनिक काळात उत्तम वक्त्याचे हे गुण राजकारणात लोकांना आकर्षति करण्यासाठी उपयोगी पडतात. मार्टनि ल्युथर किंग यांचे ‘आय हॅव अ ड्रीम’ हे जगप्रसिद्ध भाषण, हिटलर, लेनिन आणि बोल्व्हेशिक क्रांतीतील भाषणे ते स्वामी विवेकानंद यांचे धर्म परिषदेतील अजरामर भाषण हे वक्तृत्व कलेचीच देणगी.भारतीय स्वातंत्र्य ...

सी एस आर फंड शाळा विकासातील आधारस्तंभ

इमेज
सी एस आर फंड शाळा विकासातील आधारस्तंभ  शाळा म्हटली म्हणजे तेथे शिकण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा या आवश्यक असतात मग त्यामध्ये पुस्तकं, वह्या, दप्तर, लेखन साहित्य , शाळेसाठी लागणारे इतर साहित्य जसं मुलांसाठी , बेचं , कपाट  ,पंखे  टीव्ही , प्रोजेक्टर अशा अनेक वस्तूंची शाळेत आवश्यकता असते , ज्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी व शाळेच्या विकासासाठी हातभार लावत असतात . शहरी भागातील मोठमोठ्या शाळांमध्ये हा निधी फिच्या माध्यमातून उभारला जाऊ शकतो . तसच आपल्याकडीलही काही मोठ्या शाळांमध्ये हा निधी सहज उपलब्ध होतो . परंतु मराठी शाळा विशेषतः जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये शासनाकडून येणाऱ्या निधीमधून या सर्व सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही . मग अशासाठी ह्या शाळांना आधार वाटतो, गुणवत्तेसाठी आधारस्तंभ ठरतो तो लोकसहभाग यातून जमा झालेला फंड म्हणजेच सीएसआर फंड , आमची जिल्हा परिषद शाळा नवघर आज गुणवत्ता पूर्ण झालेली आहे , सर्व सुविधांनी सज्ज झालेली आहे . आनंददायी वातावरण आहे सर्व साहित्याने परिपूर्ण आहे हे कशातून घडलं तर या सीएसआर फंडातूनच . पालकांशी सा...

मी तिरंगा बोलतोय....

इमेज
मी तिरंगा बोलतोय..... झेंडा उँचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा... असे गीत तुम्ही मुले उत्साहाने गात असता. हे गीत ज्याच्याविषयी तुम्ही गाता तोच तुमचा तिरंगा, राष्ट्रध्वज आहे मी! मी स्वतंत्र भारताचा तिरंगा बोलतोय. आज मला माझ्या मनातले तुमच्याशी मोकळेपणाने बोलायचे आहे. तसे पाहता मी म्हणजे भारत देशाची आन, बान तसेच शान आहे. सर्व भारतीय  माझा आदर करतात.       बाल मिञांनो! या वर्षी आपण स्वातंञ्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.देशात स्वातंत्र्याचा उत्सव धुमधडाक्यात सुरु आहे. लहान- थोर सर्वांच्या मी मना-मनात आहेच परंतु  आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांनी 'हर घर तिरंगा' हे अभियान सुरु केल्यामुळे  आता मी प्रत्येक भारतीयांच्या घरा घरात पोहचलो आहे. यामुळे मी अतिशय आनंदात आहे.         बाल मिञांनो!माझी डिझाइन पिंगली वैंकया यांनी तयार केली आणि 22 जुलै 1947 रोजी पार पडलेल्या संविधान सभेत मला मान्यता देण्यात आली. त्याग , शांतता आणि समृद्धी चे प्रतिक असणारे तीन  रंग व त्यावर मधोमध...

महा TET 2021 Answer key.

इमेज
  रविवार 21 नोव्हेंबर 2021 रोजी पार पडलेल्या महाटीईटी परीक्षेतील पेपर 1 व दोन ची उत्तर सूची खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता https://mahatet.in/InterimAnswerKey.aspx

मावरी शाळेतील जीवन

इमेज
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6842192967868766"      crossorigin="anonymous"></script> मावरी ही न्यूझीलंड मधील आदिवासी जमात .या जमातीची बोली भाषा ही मावरीच परंतु  तेथे या भाषेपेक्षा इंग्रजीचेच जास्त वर्चस्व. या दोन भाषेतील समाजामध्ये सुप्त व उघड संघर्ष सतत चालू असतो.या संस्कृती संघर्षामुळे मावरी मुले मागासलेली गणली गेलेली.या मागास जमातीच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात टिकून राहण्यासाठी व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काही वेगळे प्रयत्न करणे आवश्यक असलेले तरी ते केवळ पठडीबाज असून उपयोगी नव्हते त्यासाठी वेगळ्या वाटेचा शोध घेणारा व त्या वाटेने जाण्याचे धैर्य दाखवू शकणारा शिक्षक असणे गरजेचे होते. 'शिक्षक या पदाचा पगार घेणे म्हणजे शिक्षक असणे नव्हे!' सिल्व्हिया वॉर्नरचा शब्दात सांगायचे तर 'शिकवणे म्हणजे विद्यार्थ्यांची लग्नच करणे असते!' सिल्व्हिया चे असे लग्न लागलेले होते. त्यामुळेच तिने या कामात आपले सर्वस्व ओतले.       ही गोष्ट आहे न्यूझीलंड या देशातील  सिल्व्हिया वॉर्नर या श...

शिक्षक करणार एनपीएसचा बहिष्कार

इमेज
शिक्षक करणार एनपीएसचा बहिष्कार       पालघर दि.10 (प्रतिनिधी दि टिचर्स व्ह्यूज) जुनी पेन्शन योजना बंद केली अन डिसिपीएस (अंशदायी निवृत्ती वेतन योजना) योजना लागू करुन शासनाने 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांची  खुप मोठी फसवणूक केली आहे .या योजनेतील तृटी , जमा रकमेचा हिशोब न देणे,शासनाचा दहा टक्के हिस्सा जमा न करणे, भविष्यातील स्पष्टता नसणे, अमंलबजावणी तील अनियमितता यामुळे आगोदरच शिक्षका हैराण आहेत, डीसिपीएस योजने विरोधात संताप व्यक्त करत आहेत.आणि अशातच शिक्षण विभागाने डिसिपीएस धारक शिक्षकांना एनपीएस (राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना) योजनेचे खाते खोलण्यासाठी फॉर्म भरण्याचे फर्मान काढले आहे.पालघर जिल्ह्यातील 2005 नंतर शासकीय सेवेत आलेल्या डिसिपीएस धारक शिक्षकांनी एनपीएस च्या सक्ती विरोधात जोरदार मोहिम सुरु केली असुन एकञीत बहिष्काराचे अस्ञ उपसले आहे. डीसिपीएस आणि एनपीएस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हीही योजना कर्मचारी/शिक्षकांच्या हिताच्या दृष्टीने घातक आहेत. आगोदरच डिसिपीएस योजनेमुळे पिचलेले शिक्षक एनपीएस योजनेमुळे आणखीनच आर्थिक विवंचनेत सापडणार आहेत.डि...

पदोन्नती प्रक्रिया लवकरच

इमेज
 पदोन्नती प्रक्रिया  लवकरच           पालघर दि. 4 डिसें.(द टिचर्स व्ह्यूज) ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याचे विभाजन, बिंदू नामावली प्रक्रिया पुर्ण नसणे आणि शिक्षकांच्या विकल्प बदल्या इत्यादी कारणास्तव  मागील सहा वर्षापासून रखडलेली शिक्षकांच्या विविध पदांची पदोन्नती प्रक्रिया लवकरच पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे.            या विषयी सविस्तर माहिती अशी कि, ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याचे विभाजन होऊन सहा वर्ष उलटले तरीही पालघर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील विविध पदांची पदोन्नती प्रक्रिया पार पडलेले नाही,तशेच शिक्षकांचे आनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पालघर जिल्हा पेसा  अंतर्गत येतो आणि आदिवासी बहुल जिल्हा आहे या ठिकाणी शिक्षक,मुख्याध्यापक  केंद्रप्रमुख,  विस्तार अधिकारी या पदांच्या आनेक जागा रिक्त आहेत यामुळे शैक्षणिक प्रगतीवर याचा विपरीत परिणाम होत आहे. सदर पदांची पदोन्नती प्रक्रिया मागील सहा वर्षापासून रखडलेली आहे. यामुळे  नवीन भरती प्रक्रिया राबवता येत नाही आणि यामुळे शिक्षणाच्या गुणवत्त...

NPS योजनेला मुदतवाढ

इमेज
     NPS योजनेला मुदतवाढ          बीड दि.10, महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शिक्षक, तसेच मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्द्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचार्यांना लागू  असलेली DCPS योजना केंद्राच्या NPS योजनेत सामाविष्ट करण्यासाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदतवाढ शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.      19/09/2019 च्या कार्यपद्धती शासन आदेशाला देण्यात आलेली ही लगातार 5 वी मुदतवाढ आहे. या मुदतवाढी देताना वेळोवेळी वेगवेगळी कारणे देण्यात आलेली आहेत. आजची मुदतवाढ देताना "तांत्रिक अडचण व कोरोना प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन मुळे अंमलबजावणी साठी विलंब होत असल्याचे"  कारण देण्यात आले आहे.      परंतु NPS ची अंमलबजावणी प्रक्रिया थांबवण्याचे एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने घेतलेली परखड भूमिका हेच आहे. शिक्षक  संवर्गाला 15 वर्षे लागू असलेल्या DCPS योजनेचा पोस्टमार्टेम केले असून, नवीन NPS ची वस्तुनिष्ठ पोलखोल केलेली आहे.रा...

त्या वृत्तीचा शिक्षकांमध्ये तिव्र संताप

त्या वृत्तीचा शिक्षकांमधे तिव्र संताप सफाळे दि.8. मास्तरड्यांनो काम केले तर मराल काय? या शीर्षकाखाली संपादकीय लेख प्रसिद्ध करणाऱ्या एका तथाकथित वृतपञाच्या संपादका विरोधात राज्यातील शिक्षक तिव्र संताप व्यक्त करत असून व संपादकाच्या मनोवृत्तीचा निषेध करत आहेत.       या विषयी सविस्तर माहिती अशी कि राज्य शासनाने शिक्षकांना दिवाळीच्या सुट्ट्या वाढवून देण्याचा शासन निर्णय पारित केला आहे यामुळे शिक्षकांमधे आनंदाचे वातावरण आहे परंतु काही शिक्षक विरोधी वृत्तींना ही गोष्ट पचली नाही. यामुळे त्यांचा तिळपापड झाल्यामुळे ते शिक्षकां विरोधात खालच्या भाषेत टिका करत आहेत. असाच एक प्रकार औरंगाबाद येथील एका स्थानिक वृत्तपत्राने केला आहे.    आपल्या संपादकीय लेखात शिक्षकां विरोधात आगदी खालच्या दर्जाची भाषा वापरुन टिका केली आहे. शिक्षकांचा मास्तरड्या असा उल्लेख करुन 'काम केले तर मराल काय?'या शीर्षकाखाली लेख लिहीला . त्यामध्ये '... तुम्ही सरकारचे जावाई अहात काय?हत्ती च्या कानातून उतरले काय,सगळं जग म्हणतंय काम हवंय आणि तुम्हाला कशाला रे सुट्ट्या?मास्तरड्यांनो जरा जास्त काम केले तर मराल क...

नांदेड विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी जतिन कदम व प्रतिभा कदम यांचे सूत्रसंचालन विषयावर लेखन;

इमेज
नांदेड विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी जतिन कदम व प्रतिभा कदम यांचे सूत्रसंचालन विषयावर लेखन;   डॉ.वंदना महाजन व डॉ.पृथ्वीराज तौर यांचे विशेष मार्गदर्शन               सफाळे दि.4 नोव्हें. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेडच्या नवीन पदवी अभ्यासक्रमातील ' व्यक्तिमत्त्व विकासासाठी : संभाषण व लेखन कौशल्ये ' या संपादित ग्रंथाचे प्रकाशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले सर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र कुलगुरू डॉ.जोगेन्द्रसिंग बिसेन व अधिष्ठाता डॉ.भगवान जाधव यांनी कन्टेन्ट आणि उत्कृष्ठ  निर्मितीसाठी कौतुक केले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ रवि सरोदे, माजी कुलसचिव डॉ. रमजान मुलांनी, डॉ केशव सखाराम देशमुख, प्रतीक्षा तालंगकर, सचिन कथले, अथर्व प्रकाशनचे युवराज माळी हे मान्यवर पुस्तक सोहळ्यास उपस्थित होते. प्रकाशक युवराज माळी आणि पाठलेखिका  प्रतीक्षा तालंगकर यांचा यावेळी कुलगुरू सरांनी प्रातिनिधिक सत्कार केला.     विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.पृथ्वीराज तौर यांनी मराठी अभ्यास मंडळाचे मनापा...

अभ्यास फेरी उपक्रमांतुन शाळा बंद शिक्षण सुरु

इमेज
     सफाळे दि. कोरोना महामारी च्या कारणामुळे मागील मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा बंद आहेत विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद आहे या शैक्षणिक वर्षातही पहिले सत्र संपत आले आहे तरी शाळा बंदच आहेत यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात कायम ठेवण्यासाठी शासन स्तरावरून ऑनलाइन शिक्षण पद्धती अवलंबिली जात आहे ही शिक्षण पद्धती शहरी भागामध्ये निमशहरी भागांमध्ये प्रभावी ठरत आहे परंतु ग्रामीण भागात सुविधांचा अभावमुळे ऑनलाइन शिक्षणात खूप आडचणी  येत आहेत.          पालघर सारख्या आदिवासी अतिदुर्गम भागात तर ऑनलाइन शिक्षण पद्धती अवलंबणे खूप कठीण काम ठरत आहे या लॉकडाउन च्या काळात  आदिवासी भागात बेरोजगारी वाढली आहे लोकांचे रोजगार  बंद आहेत. काम मिळत नाही.हाताला काम नाही यामुळे  एक वेळ खाण्याची भ्रांत आहे अशा बिकट परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारी सुविधा स्मार्ट  अँड्रॉइड फोन यासारखी सुद्धा अगदी बोटावर मोजण्याइतक्या पालकांकडे उपलब्ध आहे अशा परिस्थितीत शिक्...

काळा दिवस!

इमेज
 डीसिपीएस  कर्मचार्यांच्या जीवनात सोळाव वरीस धोक्याच.   1नोव्हेंबर काळा दिवस         महाराष्ट्र राज्यातील सर्व DCPS/NPS धारक बंधू भगिनी आज 1 नोव्हेंबर हा दिवस कर्मचारी जीवनातील "काळा दिवस" म्हणून साजरा करत आहोत. 15 वर्षांपूर्वी 31ऑक्टोबर 2005 रोजी महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढत कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात "न भूतो ना भविष्यति" असा सर्वात मोठा अन्याय केला आहे. हा अन्याय म्हणजे कर्मचार्यांच्या उतारवायची काठी म्हणून आधार असलेली, संविधानाने जिला "मौलिक अधिकार"चा दर्जा दिला व सर्वोच्च न्यायालयाने ज्यावर कर्मचार्यांचा हक्क सांगत शासनाचे कर्मचार्यांप्रति शासनाचे उत्तरदायित्व वारंवार अधोरेखित केले आहे असे "निवृत्तीवेतन"(पेन्शन) बंद केले आहे. हो हो बंदच केले आहे.ते कसे हे आता अगोदर आपण समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे महाराष्ट्रात 1 नोव्हेंबर 2005 पासून नियुक्त सर्व शासकीय कर्मचार्यांना म.ना.से निवृत्तीवेतन 1982 आणि म.ना.से. निवृत्तीवेतनाचे अंशराशिकरन 1984 हे 2 नियम 31 ऑक्टोबर 2005 च्या अधिसूचनेने केवळ सुधारणा या शब्दाचा वापर करून पूर्णतः बं...

NPS खाते उघडण्याची प्रक्रिया तात्काळ थांबविण्याचे संचालकांचे आदेश.

इमेज
   NPS खाते खाते उघडण्यााची प्रक्रिया तात्काळ थांबविण्यााचे संचालकांचे आदेश  जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या लढ्याला यश    सफाळे  दि.1नोव्हेंबर.महाराष्ट्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एनपीएस ) खाते उघडण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवून एनपीएस राबवण्यातील त्रुटी दूर कराव्यात व आक्षेप शंकानिरसन करावे असे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी मुख्य सचिव शालेय शिक्षण यांच्याकडे निवदेन सादर केले आहे. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सध्या सुरु असलेल्या डीसीपीएस योजनेचे एनपीएस मध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून चालू आहे. या प्रक्रियेतील त्रुटी, राबवण्याच्या पध्दतीतील आक्षेप यासाठी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनेने शिक्षण संचालक प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक भेट घेवून निवेदन सादर केले होते मागील आठवड्यात महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य माध्यम प्रमुख प्राजक्त झावरे पाटील, राज्य प्रवक्ते शिवाजी खुडे,  पुणे जिल्हा ...

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

इमेज
      ॲ क्सिडेंटल हॉलिडेज...!                   - दत्ता ढाकणे-बावीकर       सकाळचे सहा वाजून पन्नास मिनिट झाली आहेत. मी आत्ताच झोपेतून उठलोय आणि नेहमीप्रमाणे  माझ्या घराच्या गॅलरी बसलोय.आज मला समोरचे चिञ निराळे दिसत आहे. रोज पहाटे चार वाजता उघडणारे आमच्या सोसायटीचे गेट आज सात वाजत आले आहेत तरी बंदच आहे. कोंबडा हरवण्याचा आवाज येतोय लोक्स अजूनही साखर झोपेतच असावेत कदाचित. निरव परंतु भितीदायक  शांतता जाणवत आहे. वातावरणात जरासा गारवा आहे. तरिही दररोज  जॉगींग करणारे लोक्स नाहीत, दूर दूर कुठेच माणसं दिसत नाहीत. अजिबात गोंगाट नाही लेकरांचा रडण्याचा हे आवाज नाही . ज्याप्रमाणे पूर्वी कडक शिस्तीचे गुरुजी वर्गात छडी घेऊन येताना दिसल्यावर जसा वर्ग चिडीचूप होत असे तसा समोरचा परिसर चिडीचूप वाटत आहे. आज दूधवाला  दिसत नाही, पेपर वाल्याच्या सायकलचा ट्रिंग ट्रिंग आवाजही येत नाही. आज रविवार  खवय्यांचा खास दिवस असूनही  ' मावरं घे ...

मामाच पञ हरवले,आम्हाला नाही सापडले.....बालपणीची आठवण करुन देणारा हा खेळ.

इमेज

आपली बोटे कॅल्क्युलेटर,बोटांची जादू.

इमेज

डिसिपीएस कपातिला 100% स्थगिती

पेन्शन हक्क हक संघटनेच्या पाठपुराव्याला पुन्हा यश शिक्षकांच्या डीसिपीएस कपातिला स्थगिती.                      सफाळे -  जुनी पेन्शन योजना लागू करावी  व डीसिपीएस या अन्य...

29/9 Death resolution of young employees!!

  29/9 Government resolution is a  Death resolution of young government employees.   The Condition of Death for Money Ten lakhs of heirs of deceased employees But employees should die within 10 years.       Kelve-  Last year, for the demand of old pension, during the Mundan  Maha Acrosh Morcha, which was held at the Nagpur session, the government had promised to give ten lakh rupees financial assistance to the families of the dead staff. On Saturday, the government issued resolution.  But in this, the feeling of having a 10-year condition employees should die within 10 years. This  Dictatorship decision   make the resentment ' in the teacher and the  government  employees.     Government servants who comes in service after 1 Nov. 2005  are fighting for the demand of implementing the old civil pension scheme of 1982 for the last 12 years. Maharashtra  state government teachers and...

Principles of Outstanding Classroom Management

इमेज
CLASSROOM MANAGEMENT 5 Principles of Outstanding Classroom Management Courtesy-busy Teachers.org Effective classroom management requires awareness, patience, good timing, boundaries, and instinct. There’s nothing easy about shepherding a large group of easily distractible young people with different skills and temperaments along a meaningful learning journey. So how do master teachers do it? To get a deeper understanding of experienced teachers’ go-to classroom management strategies, we took an informal poll on Facebook, Twitter, and Instagram. Unsurprisingly, there is no silver bullet for classroom management success. That said, as we pored over the more than 700 responses, we did see some clear trends. Here are the most often cited and creative approaches. 1. TAKE CARE OF YOURSELF TO TAKE CARE OF YOUR STUDENTS As the airline safety videos say: Put on your own oxygen mask first. To learn effectively, your students need a healthy you, said our experienced teachers. ...